कुऱ्हाडीने घाव घालून शेतशिवारात महिलेची हत्या

यवतमाळ : १८ फेब्रुवारी –आर्णी तालुक्यातील खेड येथील महिलेची शेतशिवारात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना दुपारी १ वाजता दरम्यान घडली. छबू संतोष जाधव वय (४0) असे मृतक महिलेचे नाव आहे.
मृतक महिला ही घरून सकाळी ८ वाजता शेतामध्ये कापूस वेचण्याकरिता गेली होती, गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात ही घटना घडल्याची वार्ता पसरताच घटनास्थळी गावकर्यांनी धाव घेतली. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, आर्णी पोलिसांनी चौकशीकरिता मृतक महिलेचा पती संतोष लक्ष्मण जाधव (वय ४५) रा. खेड आणि चुलत दिर युवराज दुलसींग जाधव (वय ३५)संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. सदर खुनाच्या घटनेची चौकशी करून, आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मुतक महिलेच्या माहेर कडील नातेवाइकांनी मागणी केली आहे. पुढील तपास, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पितांबर जाधव, पोलिस निरीक्षक नागेश जायले करीत आहे.

Leave a Reply