बप्पी लहिरी पंचतत्वात विलीन

मुंबई : १७ फेब्रुवारी – बप्पी लहिरी यांच्या पार्थिवावर मुंबईतील विलेपार्ले परिसरातील पवन हंस घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी उपस्थित बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी जड अंतःकरणाने दिग्गज गायक-संगीतकार बप्पी दा यांना निरोप दिला. आपल्या सर्वांचे लाडके बप्पी दा आता पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा बप्पा लाहिरी यांनी त्यांना भावुक मनाने रडत-रडत मुखाग्नी दिली.
गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बप्पी दा यांनी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या एक वर्षांपासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया आणि छातीत संसर्गाची समस्या होती. हा आजार त्यांच्या मृत्यूचे कारण बनला.
बप्पी दा यांचं काल निधन झालं होतं. परंतु त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण बप्पी दा यांचा मुलगा बप्पा लहिरी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांच्या येण्याची प्रतीक्षा केली जात होती. ते आज आल्यानंतर बप्पी दा यांना मुखाग्नी देण्यात आली. बप्पी दा यांचे पार्थिव लाहिरी हाऊस ते पवन हंस घाटापर्यंत फुलांनी सजवलेल्या ट्रकवर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान, चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या

Leave a Reply