दामदुप्पट व इन्सेंटिव्हचे आमिष दाखवून केली १७ लाखांची फसवणूक

नागपूर : १७ फेब्रुवारी – पैशाच्या आमिषाला बळी पडून १७ लाख ८५ हजार रुपयांच्या फसवणुकीची घटना नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत पुढे आली आहे पोलिसांन् ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या पैशाच्या दाम दुप्पट व प्रत्येक आठवड्यात इन्सेटिव्ह किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम करून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, आरोपी विनोद दादाजी उपरे (वय ५0, रा. द्वारका अपार्टमेन्ट, खामला, प्रतापनगर) यांनी व शैलेश तल्लार (वय ४५, रा. मनिषनगर, बेसा, बेलतरोडी), पुरूषोत्तम चाचरे (वय ३0, रा. रामभुमी सोसायटी, जुना कामठी रोड, नवीन कामठी), सूर्यकांत कळंबे (वय ४२, रा. अयोध्यानगर, मानेवाडा, हुडकेश्वर), मंगला अंबोलकर (वय ५0, रा. पायेनियर सोसायटी मार्ग, एकात्मतानगर, जयताळा), ऋषीकेश अंबोलकर (रा. पायेनियर सोसायटी मार्ग, एकात्मतानगर, जयताळा), प्रमोद डोंगरे (रा. नवेगाव कुरखेडा, जिल्हा गडचिरोली), अतुल डोंगरे (रा. हुडकेश्वर), समिर जैन (वय २५ रा. प्रतापनगर), मोहन राणा (वय ४५, रा. गुलमोहर हॉल, प्रेमिला अपार्टमेन्ट, खामला, प्रतापनगर), इंदू राणा (वय ३८, रा. गुलमोहर हॉल, प्रेमिला अपार्टमेन्ट, पहिला माळा, खामला, प्रतापनगर) व इतर साथीदारांनी आपसात संगनमत करून एमरेक्स ट्रेड मनी कंपनी स्थापन केली. या सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी राकेश माणिकलाल चौरागडे (वय ३१, रा. व्यकंटेशनगर, नंदनवन) व इतर गुंतवणुकदारांना एक रकमी भरलेल्या रक्कमेवर आढवड्याला ठराविक रकमेप्रमाणे १८ आठवड्यात दिलेल्या पैशाच्या दाम दुप्पट व प्रत्येक आठवड्यात इन्सेटिव्ह किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी कंपनीमध्ये तशी योजना असल्याचे सांगून गुंतवणुक करण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी व नातेवाईकांनी ६ लाख १ हजार रपये व इतर ठेवीदारांचे ११ लाख ८४ हजार ५६१ असे एकूण १७ लाख ८५ हजार ५१६ रुपये दिले. परंतु, त्यानंतर आरोपीने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा लाभ दिला नाही.

Leave a Reply