सेल्फीच्या नादात शताब्दी एक्स्प्रेसच्या धडकेत ४ तरुणाचा मृत्यू

गुरुग्राम : १६ फेब्रुवारी – एक वाईट बातमी समोर येत आहे. शताब्दी एक्स्प्रेसच्या धडकेत ४ तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सायबर सिटी गुरुग्रामध्ये ट्रेनची धडक बसल्यानं चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चारही तरुण अँक्टिव्हानं बसई धनकोट भागाला लागून असलेल्या रेल्वे लाईनवर पोहोचले आणि ट्रेन जवळ येताच सेल्फी घेण्यात व्यस्त होते, असं सांगितलं जात आहे. जीआरपी अधिकारी रामफल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे चारही तरुणांना ट्रेनची धडक बसली आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोहोचलेले जीआरपी पोलीस अधिकारी रामफल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराय रोहिल्लाहून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी 4.48 वाजता गुरुग्राम रेल्वे स्थानकातून निघाली. संध्याकाळी 5.15 च्या सुमारास जीआरपीला चार तरुणांना रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सध्या जीआरपीने चारही तरुणांचे मृतदेह आणि मोबाईल फोन ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चार तरुण हातात पिस्तुलसारखं लायटर घेऊन रेल्वे रुळावर आले होते. यादरम्यान तेथील सर्वजण पिस्तुलासारख्या लायटरसह व्हिडिओ आणि सेल्फी घेत होते. त्यानंतर हे चारही तरुणांना मागून येणाऱ्या रेल्वेची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, तरुणांच्या मृतदेहाचे भाग 500 मीटरपर्यंत विखुरलेले दिसले. अँक्टिव्हाच्या क्रमांकावरून चार तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Leave a Reply