संजय राऊत यांची भाषा आमच्या तोंडी शोभतं नाही – किरीट सोमय्या

मुंबई : १४ फेब्रुवारी – खासदार संजय राऊत उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनात मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना संजय राऊत उत्तर देण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेताना मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी शुभकामना अशी प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्यांनी यावेळी अनिल परब यांच्या रिसॉर्टवरुन देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
जे उखडायचे उखडा संजय राऊतांच्य वक्तव्यावर कानाला हात लावत ही भाषा आमच्या तोंडी शोभतं नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत विषयाला बगल देतायेत, आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर संजय राऊतांना द्यावचं लागेल. मी मागे हटणार नाही माझी बांधिलकी जनतेशी आहे, असं सोमय्या म्हणाले. विषय कुठे नेताय ? उत्तर द्या !, असं आव्हान किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना दिलं आहे. जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तर द्या ! मृत्यू नाहीत तर लोकांचे खून झालेत, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी हल्लाबोल केलाय.
किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचा रिसॉर्ट तोडलाचं पाहिजे, असं म्हटलंय. त्यासाठी जिल्हाधिकारी , जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे.केंद्र सरकारने आदेश दिलेत तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात फायनल ऑर्डर आता आली आहे.ठाकरे सरकार का कारवाई करत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. रिसॉर्ट बांधणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

Leave a Reply