पंतप्रधानांनी वाहिली पुलवामा शहिदांना आदरांजली

नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी – जम्मू-श्रीनगर महामार्गावर जवळपास २५०० जवानांना घेऊन जाणाऱ्या ७८ बससेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ ला हल्ला केला होता. या हल्ल्यात स्फोटांनी भरलेली कार ताफ्यातील जवानांच्या एका बसला धडकली आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. जैश ए मोहमद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेनेनंतर संपूर्ण देश हळहळला होता. ही भीषण घटना देश कधीच विसरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.
पुलवामात २०१९ मध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहतो. त्यांचे सेवा आणि बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाने सर्वांना प्रेरणाना मिळेल आणि प्रत्येक भारतीय देशाला अधिक बळकट आणि समृद्ध करेल, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांना सीआरपीएफने आज लेथपोरामध्ये आदरांजली वाहिली. सीआरपीएफच्या जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले. सीआरपीएफच या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी यापुढेही काम करत राहील, असे सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक दलजित सिंह चौधरी म्हणाले.

Leave a Reply