नांदगाव येथील फ्लाय एश डंम्पिग पाइपलाइन तात्काळ हटवण्याची आदित्य ठाकरेंची सूचना

नागपूर : १४ फेब्रुवारी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नांदगावमधील औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लाय एश डम्पिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी फ्लाय एश डंम्पिग पाइपलाइन तात्काळ हटवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नांदगावमधील फ्लाय एश डम्पिंगच्या प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी केल्या होत्या. याचे व्हिडीओ देखील मी पाहिले होते. मात्र, मला स्वत: तेथील पाहणी करायची होती. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर फ्लाय एश डम्पिंगची पाइपलाइन हटवावी. तसेच, जिथे राख टाकण्यात येत होती ती जागा साफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीज आवश्यक आहे, पण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊ, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर प्रेम करणारी माणसे आहेत. येथे चांगले वन आहेत. व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामुळे विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव असल्याचे त्यांनी नागपूरात बोलताना सांगितले. तसेच, त्यांनी काल चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तेथे जाऊन पाहणी केली.

Leave a Reply