दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने झाडावरून घेतली उडी, पती-पत्नी जखमी

गोंदिया : ७ फेब्रुवारी – दुचाकीने प्रवास करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने झाडावरून उडी मारल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बोदरा-अर्जुनी मोर मार्गावर जंगल परिसरात सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये गंभीर जखमीचे नाव अरुण काळसर्पे व त्यांची पत्नी प्रतिमा काळसर्पे रा. बोदरा आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोदरा येथील अरुण काळसर्पे व त्यांची पत्नी दुचाकीने बोदरा येथुन अर्जुनी मोर. मार्गे आसोलीला लग्न समारंभासाठी जात होते. बोदरा-अर्जुनी मार्ग हा जंगलव्याप्त आहे. या परिसरात नेहमीच हिंस्र जंगल जनावरांचा वावर असतो. या जंगल शिवारात एक बिबट हा माकडांच्या शिकारी साठी झाडावर चढला. त्याचवेळी सदर जंगल परिसरातील रस्त्याने अरुण काळसर्पे व त्यांची पत्नी दुचाकीने जात असता बिबट्याने झाडावरून दुचाकी वर छलांग मारली. त्यामुळे, दोघेही पती-पत्नी दुचाकीवरून पडले. व गंभीर जखमी झाले. जंगल परिसरात काम करणारे लगेच धावून आल्याने बिबट पळुन गेला. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. लागलीच जखमी पती-पत्नींना ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे हलविण्यात आले. लगेच वनविभागाच्या कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट दिली. व बयान घेऊन पंचनामा केला. बोदरा/देऊळगाव परिसरात सध्या बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली. रात्री बेरात्री बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply