अमर आत्मा – स्वाती खापर्डे.

नाही मी जगात तरिही,
राहू नका शोकात कोणी ,
गेले मी म्हणुनी नका
आणु चुकून डोळ्यात पाणी

साता सुरातुनी फिरे प्राण कुडी सोडोनी।।

सुरात प्राण फुंकुनी
घ्या अस्तित्वाची अनुभूती
गेल्यावरती कशी उरलेते
लकेरी ताना सांगती
आत्म्याशी तादात्म्य् सूरांचे
आले असे घडोनी
साता सुरातुनी फिरे प्राण कुडी सोडोनी।।

मंतरलेल्या सुरात माझा
जीव असेहो वसला
नक्कीच मी ऐका मला
घेता शंका कशाला?
वीणा असो की बासुरी
किंवा सुरेल गळ्यातुनी
साता सुरा तुनिफिरे प्राणकुडी सोडोनी।।

अद् भुत दुनिया सुरावटीची
घ्या सुरावरी हिंदोळे
स्वरपुष्पांचा सुगंध
गीतागीतातुनी परिमळे
देवा अहोभाग्य माझे
मज दिले इथे ठेवोनी

सातासुरा तुनी फिरे प्राण कुडी सोडोनी।।

स्वाती खापर्डे.

Leave a Reply