गडचिरोलीत मुलानेच केली बापाची हत्या

गडचिरोली : ४ फेब्रुवारी – गडचिरोली शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या विसापूर टोली गावात मुलाने बापाची हत्या केल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक वडीलाचे नाव दामोदर तांगडे (वय ५५) असून, तेजस दामोदर तांगडे (वय २४) रा. विसापूर असे आरोपीचे नाव आहे.
तेजसने बापाची हत्या केल्यानंतर फरार झाला. परंतु पोलिसांनी त्याच्या मोबाइल लोकेशनवरून माहिती मिळवत नियोजनबद्ध तपास लावून आरोपी तेजसला दोन तासात गडचिरोली शहरातील एसटी डेपो परिसरातून पकडले. हत्या झाल्याची माहिती पोलीस स्टेशन मिळताच, तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा करून मृतक दामोदर तांगडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहेत.
मृतक दामोदर तांगडे यांना दोन मुले असून मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी-६० पथकात कार्यरत असून लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. दारूच्या नशेत वडिलांसोबत झालेल्या वादामुळे लहान मुलाने कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण, तेजस मोहिते यांच्या नियोजनबद्ध तपासामुळे आरोपीस अवघ्या दोन तासात ताब्यात घेण्यात आहे. हे विशेष. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply