दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार – वर्षा गायकवाड

मुंबई : ३० जानेवारी – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या म्हणाल्या. आम्ही राज्य सरकारच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्यावतीनं कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. दहावी बारावी परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत आहोत, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी मुख्याध्यपकांनी केली होती.
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय शिक्षणाचं आज व्याख्यान ठेवलंय.ते सत्य, अंहिसा आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते.खासदार अमोल कोल्हे यांनी जी भुमिका केली त्याबद्दल त्यांनी आत्मक्लेश व्यक्त केलंय. जगभरात गांधींना मानणारा मोठा वर्ग आहे. देशाचे पंतप्रधान मोदी महात्मा गांधी यांच्या विचारांवर देश चालतो. ते प्रतिमेचं पूजन करतात, पण त्यांच्या पक्षाची भूमिका ही वेगळी आहे, चुकीची आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या पक्षाचे लोक गांधींंवर गोळी झाडणाऱ्यांचं समर्थन करतात, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपला इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे. जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल की गाधींनी अनेक आंदोलनं केली. सत्य कधी लपून राहत नाही. जे नथूराम गोडसे शौर्य दिन म्हणून साजरा करतात त्यांना काय म्हणावं, अशांवर कारवाई करायला हवी, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. अमृता फडणवीस यांच्या ट्विटचं खंडन करत असून सर्वांनी बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Leave a Reply