जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या आवारातच जुगार खेळात असतांना अटक

यवतमाळ : ३० जानेवारी – यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात काही कर्मचारी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यावरून साफळा रचून धाड टाकली असता आठ कर्मचारी जुगार खेळतांना अटक करण्यात आली. ही कारवाई रात्री एक वाजताच्या सुमारास करण्यात आली. यावेळी घटनास्थळाहून काही मोठे अधिकारी फरार झाल्याची माहिती आहे.
यावेळी प्रकाश वामनराव कुद्रुपवार (वय ५३, रा प्रभात नगर यवतमाळ), देवानंद विठ्ठलराव जामनकर ( वय ४८ रामशास्त्री नगर ), गणेश भीमराव गोसावी ( वय ५५, रा. शिवम कॉलनी लोहारा ), प्रकाश भैयालाल व्यास (वय ५८, राहणार जिल्हा परिषद क्वार्टर, जामनकरनगर), गुनवंत तुकाराम ढाकणे (वय ४७, रा. साईराम किराणाजवळ, जामनकरनगर), अनिल तुकाराम शिरभाते ( वय ४५, रा. साईराम किराणाजवळ, जामनकर नगर), संदीप रामराव श्रीरामे (वय ४५, रा. वैभवनगरी, बसवेश्वर भवन जवळ ) चरण तारासिंग राठोड ( वय ५३, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी ) यांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याजवळून मोबाईल, दुचाकी आणि चारकाकी वाहन असा ५ लाख चार हजार ६१0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरून येरावत चव्हाण हा पसार झाला असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply