ओंजळीतील फुलं : २६ – महेश उपदेव

30 jan BHAU-SPECIAL

भाऊ काणे- समर्पित प्रशिक्षक

नागपूरातील स्टेट बँके मध्ये खेळणारे संजय उर्फ भाऊ काणे गेल्या ३५ वर्षापासून सातत्याने उदयोन्मुख खेळाडू अँथ्लीट घडवि०याचे कार्य करीत आहे, सेवा निवृत्ती नंतर ही त्यांचा ध्यास सुटतेला नाही, आज ही होतकरू खेळाडूंना ते मदत करीत असतात असंख्य राष्ट्रीय खेळाडू व आंतरराष्ट्रीय खेळाडू भाऊंनी घडविले आहे, शिवसेना भाजप युतीने भाउंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देवून गौरविले होते, केंद्रसरकारने त्यांचा यथोचित सन्मान करायला हवा. १९९५ ते १९९८ पर्यत ते महाराष्ट्र क्रीडा परिषदेचे सदस्य होते.

आधुनिक क्रीडा साधनाची टंचाई अशा प्रतिकूल परिस्थीती वर मात करीत भाऊं काणे यांनी निरंतर एका उत्तम आदर्श प्रशिक्षकाची भूमिका आज ही जगत आहे.

आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता नायगावकर, अपर्णा भोयर, अर्चना पोटे, संगीता सातपुते, रश्मी भोयर, गायत्री बेदरकर, धनश्री चावजी सारखे अँथ्लीट नावारुपास आले.

भाऊ काणे यांना विदर्भातील पहिला दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या शिष्या,चारूलता नायगांवकर हिला राज्य शासनाने १९९० मध्ये शिव छ्त्रपती पुरस्कार देवून गौरव केला, चारूने अनेक आंतर विद्यापीठ स्पर्धत सुवर्ण पदक पटकावले, तिने जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले, भाऊंची शिष्या चारूलताने देशात नाव कमावल्यानंतर भाऊंच्या प्रत्येक खेळाडूं कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, चारूच्या पाठोपाठ अपर्णा भोयर ने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धत सुवर्ण पदक पटंकावल्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही, १९९२-९३ मध्ये तिलाही शिवछ्त्रपती पुरस्कार देवून गौरव करण्यात आला,संगीता सातपुते हिला ही राज्यशासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला,

अपर्णा भोयर हिची बाहिण हिने क्रॉसकंट्री स्पर्धा मध्ये भरीव कामगिरी केली, २००१-०२ मध्ये राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा शिव छत्रपती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

या खेळाडू सोबत मनोज बालपांडे,शंकर तुले, निलेश चोपडे, योगेश ठाकरे या धावपटूनी भाऊंच्या मार्गदर्शनात भरीव कामगिरी करीत राष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव चमकविले.

मुळात भाऊ काणे खोखो पटू असून त्यांनी महालात नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खो खो खेळ जीवंत ठेवला, खो -खो मधील चपळ् खेळाडू निवडून अँथ्लीट तयार केले,

भाऊनी आपल्या शिष्याच्या खेळाकडेच नाही तर त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले, भाऊ वाणिज्य शाखेचे विदयार्थी असल्यामुळे त्यांनी वाणिज्य शाखेच्या क्रीडापटूना वाणिज्य शाखेचे क्लास घेवून प्रथम श्रेणीचे पदवीधर बनविले.

प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांच्या मध्ये गुरुशिष्याची भावना असावयास हवी, या प्रकारचा समन्वय असला तर जिवनातील उदिष्ट गाठता येते, भाऊंच्या कार्याला सलाम.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply