उपराजधानीत गेल्या २४ तासात ४०२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ६ मृत्यू

नागपूर : २५ जानेवारी – नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कोरोनाची तिसरी चांगलाच धुमाकूळ घालत आहे. गेल्या १० दिवसांपासून रुग्णसंख्या ४ हजारांच्या घरात कायम आहे. शहरात आज ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात ४०२८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरु झालेले निर्बंधही कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात अयशस्वी ठरत आहेत. गेल्या २४ तासात शहरात ४०२८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ५४३०६४वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ९७२ रुग्ण ग्रामीण भागातील,२९५६ शहरातील तर १०० जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. आज शहरात ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यातील ५ रुग्ण अशहरातील आहेत तर एक ग्रामीण भागातीतलं रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात अली आहे. त्यामुळे एकूण कोरोना मृत्यूची संख्या आता १०१८३ वर पोहोचली आहे.
आज शहरात एकूण ११३७७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील २७२८ चाचण्या ग्रामीण भागात तर ८६४९ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात २५१९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५०३७२९ वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर गेले आहे. आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ३९३ रुग्ण ग्रामीण भागातील, १९१६ शहरातील तर २१० रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. शहरात सध्या २९१५२ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील ६६६९ रुग्ण ग्रामीण भागातील तर २२१४६ शहरातील तर ३३७ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.

Leave a Reply