दिल्लीतील इंडिया गेटवर उभारणार सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा – पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती

दिल्ली : २१ जानेवारी – दिल्ली येथील इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही संपुर्ण भारतीय जनतेला दिली आहे. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित उभारणार त्यांनी ट्विटमध्ये सांगितले.
23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सुध्दा ते म्हणटले आहेत, “ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवायला आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवला जाईल.”
भाजपकडून सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास पुसून टाकण्याचं काम सुरू आहे असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, ‘आमच्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझली जाईल हे अतिशय दुःखद आहे. तसेच काही लोकांना देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाही, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा जाळू असं राहूल गांधींनी ट्विटमध्ये म्हणटलं आहे.

Leave a Reply