गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नाव उलटून एका महिलेचा मृत्यू

नागपूर : २० जानेवारी – नागपूर जिल्ह्यातील कुजबा गावाजवळ गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक नाव उलटण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. नावेत एकूण सहा प्रवासी होते. त्यापैकी पाच जणांनी पोहून स्वतःचा जीव वाचवला. मात्र एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्राण वाचलेल्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटली असून गीता रामदास निंबारते असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच कुजबा गावातील ग्रामस्थ मदतीकरिता धावून आले होते. तर कुही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच कुजबा गावातील ग्रामस्थ मदती करीता धावून आले होते. तर कुही तालुक्यातील वेलतुर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार घटनेच्या वेळी नावेत गीता रामदास निंबारते, मनू साळवे, मनीषा ठवकर, लक्ष्मी गिरी, मंगला भोयर आणि परमानंद तिजारे बसलेले होते. यापैकी गीता रामदास निंबारते यांचा बुडल्याने मृत्यू झाला आहे.
ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. कुजबा येथील पाच महिला कापूस वेचण्याच्या कामासाठी आम नदीच्या पलीकडील शेतात नावेतून जात होत्या. नाव अचानक फुटल्याने नावेत पाणी शिरू लागल्याने महिला घाबरल्या, त्यामुळे नाव उलटली असे प्राथमिक तपासात समोर आलेले आहे

Leave a Reply