भंडाऱ्यात नाना पटोलेंना धक्का! विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे पराभूत

भंडारा : १९ जानेवारी – घरच्या मैदानावर नाना पटोले यांना मोठा धक्का बसलाय. कारण भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षाला पराभावाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलंय. जरी भंडारा जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे पराभूत झाले असले तरी पर्यायाने ते नाना पटोले यांचं अपयश मानलं जातंय.
नाना पटोले यांनी निवडणुकीच्या प्रचारात अतिशय आक्रमक मुद्दे मांडत विरोधकांना झोडपून काढलं होतं. भंडारा जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आणि जि.प. अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार, असा विश्वास नानांनी बोलून दाखवला होता. पण त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे पटोलेंची मान खाली गेली आहे.
रमेश डोंगरे यांच्या रुपाने भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे. भागडी गटात त्यांचा पराभव झालेला आहे. भागडी गटातून भाजपच्या प्रियांका बोरकर यांनी रमेश डोंगरे यांना आस्मान दाखवलं.
नाना पटोले यांच्यावर खांद्यावर महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढल्या. परंतु नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला विशेष चमक दाखवता आली नाही. सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्या तुलनेत जोरदार कमाल केलीय. राज्यात तर काँग्रेस आपली जादू दाखवू शकलं नाही पण प्रदेशाध्यक्षांच्याच होम ग्राऊंडवर काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय. नाना पटोले यांचं हे मोठं अपयश मानलं जातंय.

Leave a Reply