दारू पितांना झालेल्या वादातून अमरावतीत एकाची हत्या

अमरावती : १९ जानेवारी – चांदूरबाजार शहरात काल रात्री १0. ३0वाजता, आपसात झालेल्या वादातून एका २७ वर्षे युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली.सदर घटना मोर्शी रोडवरील सचिन रेस्टॉरंटचे मागिल खुल्या जागेत घडली. सोबत दारू पितांना आपसात झालेल्या वादातून,हे हत्यांकाड घडल्याचे कळते. यात दोन युवक आपल्या बचाव करतांना गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणातील मृतकाचे नाव जव्वा उर्फ जावेद खान गफलत खान,वय २६ वर्षे रा. कसाबपूरा चांदूरबाजार असे आहे.गंभीर जखमी झालेल्यां मध्ये, मो.शहजाद अ.रउफ वय २८ व करण खोडे वय २७ यांचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता या प्रकरणातील मित्र मृतकासह ,मो.शहनाज,जावेद खान, सुलतान ऊर्फ राजा खान, कमल शिरसाट,करण खोडे,श्रीकेत ढोमने, अच्चू कुरेशी हे बाजारपेठेतील नयना बार मध्ये श्रमपरिहारासाठी सुरेचा स्वाद घेत बसले होते. यादरम्यान दारूचा अंमल चढत असताना,खाण्या – पिण्याचे कारणावरून आपसात वाद सुरू झाला.अच्चू कुरेशी व कमल शिरसाट यांचेत झालेल्या वादातून,ही सर्व मंडळी या बार मधून निघून गेली. परंतू पून्हा सुरेचा स्वाद घेण्यासाठी,ही मंडळी वेगवेगळ्या गटांत एकत्र आली.नयना बार मध्ये पिण्यासाठी एकत्रीत आलेल्या मित्रां पैकी,श्रीकेश ढोमणे व करणं खोडे यांचे सह प्रकरणातील आरोपी घनश्याम डिठोर हे तिन मित्र एकत्र आले.हे तिघेही रात्री ९.३0 वाजता मोर्शी रोडवरील,सचिन रेस्टॉरंट चे मागे बियर पीण्यासाठी बसले.या दरम्यान रात्री १0 वाजता नयना बार मधील वादातील मृतकासह उर्वरित मित्र मोहंमद शहजाद,जावेद अहमद,राजा खान,कमल शिरसाट हे सुरेचा स्वाद घेण्यासाठी सचिन रेस्टॉरंट मागे आले.हे सर्व येण्या आधीच सदर रेस्टॉरंट मागे,आरोपी सह त्याचे दोन मित्र बियर पीत असलेले नंतर आलेल्या मित्रांना दिसले.नंतर आलेले पाचही मित्र आधी झालेल्या वादा मुळे, आरोपी घनश्याम डिठोर याने,मृतक व मो.शहजाद यांना शिवीगाळ करून धमक्या देणे सुरू केले.यातून वादाचे रूपांतर तर भांडणात झाले.आरोपी ने मृतकास व जखमी किरकोळ मारहाण सुरू केली.यावेळी इतर मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आरोपींने आपल्या जवळील चाकूने, मृतकास गंभिर जखमी केले.या वादावादीस्वत:चार बचाव करतांना,करण खोडे व मो.शहजाद ही गंभीर जखमी झाले आहेत.
या चाकू हल्ल्यानंतर आरोप मुख्य रस्त्यावर येऊन, दारूच्या नशेत मी जवाला मारले – मी जवाला मारले असे ओरडायला लागले. घटनास्थळवरून करण खोडे याने मृतकास व जखमी मो.शहजाद यास, गाडीत टाकून स्थनिक पोलीस स्टेशनला आणले. त्यांची गंभीर अवस्था पाहून पोलिसांनी,त्यांना ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.प्राथमीक उपचारा दरम्यान या तिघांना उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविले.तेथे उपचारा दरम्यान मृतक जव्वा उर्फ जावेद यांचा मृत्यू झाला.तसेच दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमी मो.शहजाद यांचे तक्रारी वरून,३0२,३0७, ५0४,५0६ भादवी दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्य आरोपी घनश्याम डिठोर वय २७ यास अटक केली आहे. तसेच करण खोडे वय २६ व श्रीकेश ढोमणे वय २५ यांनाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply