ओंजळीतील फुलं : १८ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

दुर्लक्षित हॅण्डबॉलचे पितामह

राज्यात डजनाभराच्या वर आंतरराष्ट्रीय आणि शंभरपेक्षा जास्त राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू घडविणारे राज्याच्या उपराजधानीतील हॅण्डबॉलचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ८७ वर्षीय सीताराम भोतमांगे आजही दुर्लक्षित आहेत. प्रामाणिकपणे कष्ट करून खेळाडू घडविणारे सीताराम भोतमांगे सरांना दादोजी कोंडदेव पूरस्कारापासूनही १९९६ मध्ये वंचित ठेवण्यात आले होते. मी माझ्या लेखणीने त्यांना न्याय मिळवून दिला होता. १९९३-९४ चा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळवून दिला होता. १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात आल्यानंतर सीताराम भोतमांगे सरांना न्याय मिळवून देण्यात “सामना”चा सिंहाचा वाटा होता मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भोतमांगे सरांना हा पुरस्कार देऊन गौरवान्वित केले होते ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही. आज भोतमांगे सर ८७ वर्षाचे असूनही खेळाडू घडविण्याचे काम अहोरात्र करत आहे. महाराष्ट्राची शान असलेले भोतमांगे सर राज्याच्या क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारापासून आजही वंचित आहे. राज्याचे क्रीडामंत्री व नागपूरचे भूमिपुत्र सुनील केदार यांनी लक्ष घालून भोतमांगे सरांचा गौरव करावा अशी नागपूरच्या तमाम खेळाडूंची इच्छा आहे. भोतमांगे सर पुरस्कारासाठी काम करीत नाही खेळाडू घडविणे त्यांचे ध्येय आहे.
१९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर त्यावेळचे क्रीडामंत्री गुलाबराव गावंडे यांनी दादोजी कोंडदेव पुरस्कारासाठी वर्धा येथील कबड्डी संघटनेचे पदाधिकारी सुभाष पिसे यांचे नाव सुचविले असल्याची माहिती मला मिळताच मी शकेडो राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या सीताराम भोतमांगे यांना डावलून पिसे यांना हा पुरस्कार कसा देता यासंदर्भात वृत्तमालिका चालविली होती. यावेळी मला लोकसत्ताचे क्रीडा प्रतिनिधी सुनील चावके यांनी मदत केली तत्कालीन क्रीडा मंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपली चूक कबुल करीत शेवटी दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार सीताराम भोतमांगे यांना जाहीर केला तो माझ्या लेखणीचा विजय होता आजही भोतमांगे सर म्हणतात महेश तू सरकारच्या लक्षात हा घोळ आणून दिला नसता तर मला हा पुरस्कार मिळू शकला नसता. पहिला दादोजी कोंडदेव पुरस्कार नागपूरचे नामांकित ऍथलिट प्रशिक्षक भाऊ काणे यांना मिळाला होता. सीताराम भोतमांगे यांना मिळालेला दादोजी कोंडदेव हा दुसरा पुरस्कार आहे.
नागपूरचे योगगुरू विठ्ठलराव जिभकाटे यांनी त्याकाळात शेकडो योग शिबिरे घेऊन नागपूरकरांना योगाचा अभ्यास दिला. तेही छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारापासून वंचित होते. त्यांनाही हा पुरस्कार मिळवून देण्याकरिता मी प्रयत्न केले होते. आणि राज्यसरकारने सामनाच्या वृत्ताची दखल घेऊन विठ्ठलराव जिभकाटे यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरव केला. नागपूरची राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नीता दळवे उत्कृष्ट खेळाडू असूनही पुरस्कारापासून वंचित होती. तिच्यासंदर्भात व तिला देशाचा सर्वात मोठा अर्जुन पुरस्कार मिळावा याकरिता मी विशेष प्रयत्न केले होते केंद्रसरकाने सामनाच्या वृत्ताची दखल घेऊन नीताला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले हा पुरस्कार विदर्भाकरिता मोठा ठेवा ठरला अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतरही नीताला राज्याचा छत्रपती पुरस्कार मिळाला नव्हता त्यासाठीही झगडावे लागले शेवटी तिचा छत्रपती पुरस्कार देऊन राज्यसरकारने गौरव केला राज्याचे बास्केटबॉल क्षेत्रातील क्रीडा संघटक मुकुंद धस यांना मिळणारा क्रीडा संघटकाचा छत्रपती पुरस्कार टपाल तिकीट गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला दिला जाणार होता त्याविरुद्ध मी आवाज उठविल्यानंतर महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा क्रीडा संघटकाचा छत्रपती शिवाजी पुरस्कार मुकुंद धस यांना जाहीर करण्यात आला.

खेळाडूच ही संपत्ती

गेल्या ५ दशकापासून खेळ आणि खेळाडूंची निस्वार्थपणे सेवा करणारे भोतमांगे सरांनी राजकुमार नायडू, रुपकुमार नायडू, नरेंद्रसिंग सग्गु, अत्तु उर्फ आत्माराम पांडे, वीरेंद्र भंडारकर गजानन जाधव , डॉ. राजन वेणूकर , धनंजय वेणूकर, विपीन कामदार मिलिंद माकडे, अतुल दुरूगकर,मुरली नंबियार,सुनील भोतमांगे संजय भोतमांगे,बाबा देशमुख, इंदरजितसिंग रंधावा लता मुदलियार , संजीवनी चांद्रायण . विद्या किणी,मंगला मानापुरे जया मानापुरे निवेदिता मेहता, अनिता हलमारे,भावना किंमतकर,ललिता अवचट,पूनम कडव यांच्यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत हीच माझी खरी श्रीमंती आहे या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राज्याचे नाव मोठे केले आहे एवढेच नाही तर हॅण्डबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षकही तयार केले आहे. त्यात बाबा देशमुख भाऊ धुमाळ पवन मेश्राम आशिष बॅनर्जी मदन टापरे यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षक राज्यात विविध ठिकाणी खेळाडू घडविण्याचे काम करीत आहे
१९७१ पासून यशवंत स्टेडिअममध्ये हँडबॉल खेळाडू घडविण्याचे काम सीताराम भोतमांगे सर करीत आहे ते उत्कृष्ट कुस्तीगीर असून त्यांचे मार्गदर्शन मल्लाना होता असते मीपण हँडबॉल खेळाचे धडे भोतमांगे सरांच्या हाताखाली गिरविले ध्येयवेडे गुरु म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते त्यांच्या तालमीत तयार झालेल्या हॅण्डबॉलपटूनि चीन जर्मनी हॉंगकॉंग फिलिपाइन्स इराण नेपाळमध्ये झालेल्या आशियायी,राष्ट्रकुलसह विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकविला आहे. भोतमांगे यांनी घडविलेले खेळाडू राज्यात विविध खात्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी करीत आहे माजी कुलगुगु डॉ. राजन वेलूकर हेदेखील भोतमांगे यांचे शिष्य आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त छत्रपती पुरस्कार भोतमांगे सरांच्या खेळाडूंना मिळाले आहे.

संपूर्ण कुटुंबच हँडबॉल खेळाडू

भोतमांगे सरांचे संपूर्ण कुटुंबच हँडबॉल खेळाला समर्पित झालेले आहे या कुटुंबातील ९ जणांनी मैदान गाजविले आहे भोतमांगे सरांचा मुलगा डॉ. सुनील, संजय मुलगी नंदिनी यांनी हँडबॉल खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली असून सरांच्या स्नुषा अनिता हलमारे भावना किंमतकर यापन हॅण्डबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. आता तिसरी पिढीही हाच वारसा जपत आहे. भोतमांगे सरांच्या नाती साक्षी, मोनिका, राधिका हॅण्डबॉलपटू म्हणून मैदान गाजवत आहे. हँडबॉल खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशात नेण्यात या परिवाराचे मोठे योगदान आहे.

तीन छत्रपती पुरस्कार एकाच घरात

भीतमांगे सर कधी हँडबॉल खेळले नाही मात्र त्यांनी प्रशिक्षक म्हणू शेकडो खेळाडू घडविले आहे पुरस्काराच्या बाबतीत भोतमांगे सरांचे कुटुंब नशीबवान आहे भोतमांगे सरांना उत्कृष्ट प्रशिक्षकाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. त्यात डॉ. सुनील भोतमांगे अनिता भोतमांगे भावना भोतमांगे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक शिवछत्रपती पुरस्कार भोतमांगे सरांनी घडविलेल्या खेळाडूंना मिळाले आहे. आज वयाच्या ८७व्या वर्षीही भोतमांगे सर खेळाडू घडविण्याचे कार्य करीत आहे अशा व्यक्तीचा राज्य शासनाने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करायला हवा त्याकरिता शासनाने त्यांच्याकडून अर्ज मागवू नये त्यांच्या कामाची व कार्याची पावती म्हणून सरकारने दखल घेऊन स्वतःहूनच जीवनगौरव पुरस्कार द्यायला हवा पुरस्कारासाठी त्यांनी कधीच काम केले नाही प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणारे खेळासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे शासनाचं कर्तव्य आहे हॅण्डबॉलचे भीष्म पितामह सीताराम भोतमांगे सरांना माझा सलाम

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply