जर मोदी नावाचा माणूस मिळून आला नाही तर नक्कीच माझ्यावर कारवाई करा – नाना पटोले

नागपूर : १८ जानेवारी – तथाकथित मोदी नावाच्या व्यक्तीला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. जर मोदी नावाचा माणूस मिळून आला नाही तर नक्कीच माझ्यावर कारवाई करा, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते नागपूर विमानतळावर मुंबईला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडलेले आहे. तक्रारकर्ते आणि नागरिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. देशातील मुद्यांवरून लक्ष भरकटण्याचे काम भाजपच्या लोकांकडून केले जात आहे. देशात बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे. त्याकडे दुर्लक्ष करून भाजप वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. यात प्रधानमंत्री पद देशाचे आहे. ते कुण्या एका पक्षाचे नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले आहे. त्यापदाचा गौरव आणि गरिमा चांगल्या पद्धतीने माहित आहे. मात्र, ज्या पद्धतीने भाजप राज्यात कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करत आहे. ते चुकीचे आहे. कुठलेही कारण नसताना अटकेची मागणी करत आहे. लोकांनी मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार केली नसेल आणि त्या नावाचा गावगुंड नसेल तर म्हणाले नक्कीच माझ्यावर कारवाई करा, असे सांगितल्याचे नाना पटोले यावेळी म्हणालेत.
मी काही भाषण देत नव्हतो. मी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांच्याशी बोलत होतो, असे स्पष्टीकरण दिले. ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली जाते. महाराष्ट्राची जनता निश्चितपणे भाजपला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले यावेळी म्हणालेत.
या प्रकरणात भंडारा पोलीस कारवाई करत आहे. मी भाषणात बोलत नव्हतो. मात्र, मी लोकांशी संवाद साधत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. यावेळी त्या गुंडांबद्दल बोललो आहे. लोकांची त्या गुंडापासून भीती काढण्यासाठी असे बोलत होतो. आज देशाला लुटून नीरव मोदीसारखे भगोडे पळाले आहे. दाऊदला पकडून आणण्याच्या गोष्टी करणारे भाजप सरकार त्यावर काहीही बोलत नाही. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हेच लोक कशा पद्धतीने वक्तव्य करत होते याचा विसर कदाचित त्यांना पडला असेल. पंतप्रधान पदाची महिमा काँग्रेस पक्षाला माहीत आहे. प्रधानमंत्री पदाची गरिमा कायम ठेवून सन्मान करण्याचे काम काँग्रेस करेल, असेही नाना पाटोले म्हणाले.

Leave a Reply