उच्च न्यायालयाने आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

मुंबई : १७ जानेवारी – एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार नितेश राणे यांचा जामिन अर्ज नाकारण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी हा निकाल दिला आहे. नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस स्टेशन मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला. मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कणकवली येथील शिवसेना तसेच भाजप कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
याआधी सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्यावर आज सुनावणी पार पडली आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळण्यात आला आहे.
अर्जावर दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज कोर्टाने निकाल जाहीर केला आहे.

Leave a Reply