आता आठ सीटर वाहनांमध्ये सुद्धा किमान सहा एअरबॅग्स असणे बंधनकारक – नितीन गडकरी

नागपूर : १६ जानेवारी – आता आठ सीटर वाहनांमध्ये सुद्धा किमान सहा एअरबॅग्स असणे बंधनकारक केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. आता ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीसह कारमधील इतर प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एअरबॅग अनिवार्य केली आहे. त्यामुळे निश्चितच अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात आता सर्व आठ सीटर असलेल्या सर्व कारमध्ये वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तिसह मागील प्रवासी आता सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे. १ जानेवारी २०२१ पासून चालकाशेजारी बसणाऱ्या प्रवाशांसाठी एअरबॅग फिटिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याला १५ दिवसही लोटत नाही तर, आता आठ सीटरमध्ये किमान सहा एअरबॅग लावणे कार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. त्यामुळे यात कारच्या किमतीत वाढ होणार आहे.
रस्त्यावर होणाऱ्या वाहनाच्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव दरवर्षी जात असतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा अपघातात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी होणार आहे. या संदर्भात ट्विट करून ही माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे.

Leave a Reply