शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आ. श्वेता महाले यांनी बँक व्यवस्थापकास धरले धारेवर

बुलडाणा : १४ जानेवारी – अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पिकविम्याची आलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जात नव्हती. ती रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात होती. किंवा त्या खात्याला होल्ड करणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास आमदार श्वेता महाले यांनी चांगलेच धारेवर धरत एकेरी भाषेत झापले. यावेळी मॅनेजरला माफीसुद्धा मागायला लावली. आमदार महाले ह्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड का लावला म्हणून चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काल गेल्या होत्या. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषा ही केलीय.
बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानीसह उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात होते. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता. या बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली तरीही आमदार श्वेता महाले यांचे त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगूनही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नव्हता. त्यामुळं आमदार श्वेता महाले यांनी काल बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारलाय. यावेळी त्याला आमदारांनी चांगलेच झापले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होतो. तर आमदारांच्या या अवतारानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला. आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली, अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली.

Leave a Reply