यवतमाळमध्ये ७ लाखांच्या चंदनासह एक अटकेत, एक फरार

यवतमाळ : १२ जानेवारी – दि. ११ जानेवारी रोजी मौजे मुरझडी शिवारात अवैधरित्या चंदन वृक्षाची तोड करून ते बिनापरवाना विक्रीसाठी पोत्यात भरून आणत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे व फिरते पथक स्टाफ तसेच प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व स्टाफ यांनी मुरझडी गाव शिवारात सापळा लावून बसले असता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दोन इसंम पोते खांद्यावर घेऊन येत होते चंदनाची तस्करी करणारे हेच असल्याची खात्री झाल्यावरून वनस्टाफ व पोलिस स्टाफ यांनी पाठलाग केला असता एक इसमाला पकडले त्याचे नाव दशरथ सूर्यभान नागमोते रा. मुरझडी चिंच असे आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.
एक इसम फरार झाला त्याचा शोध घेणे सुरु आहे. सदर प्रकरणात चंदन तुकडा, बूंदा लाकडे. एकूण नग ५१ व वजन ९५.७३0 किलो अंदाजीत किमत ७ लाख ६५ हजार ८४0 रुपये अशी आहे. सदर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला . सदर कार्यवाही चेतन नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी ,प्रदीप परदेशी पो .नी स्थानिक गुन्हे शाखा, स. पो. नी गणेश वनारे ,स. पो. नी विवेक देशमुख पो .उ .नी योगेश रन्धे ,उल्हास कुरकुटे ,महमद चव्हाण व पोलिस स्टाफ तसेच वनविभागाचे दुर्गासिंग गहरवाल, जितेंद्र खोब्रागडे, मंगेश चौधरी ,भास्कर नांदने, रामेश्वर शिरसागर व वन स्टाफ यांनी केली. सदर प्रकरणात सखोल चौकशी केशव वाबळे उपवनसंरक्षक यवतमाळ, उत्तम फड विभागीय वनाधिकारी दक्षता, अनंता दिघोडे सहायक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Leave a Reply