मी भाजपला लाथ मारली आहे, परत जाण्याचा प्रश्नच येत नाही – स्वामी प्रसाद मौर्य

नवी दिल्ली : १२ जानेवारी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपसह योगी सरकारला मोठा हादरा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी आता मोठे वक्तव्य केले आहे. भाजपमध्ये परतण्याची शक्यता मोर्य यांनी पूर्णपणे फेटाळून लावली. ‘मी भाजपला लाथ मारली आहे, परत जाण्याचा प्रश्नच येत नाही’, असे मौर्य म्हणाले. स्वामी प्रसाद मौर्य हे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी (एसपी) मध्ये प्रवेश करणार आहेत. यावरही स्वामी प्रसाद मौर्य यांनी उत्तर दिले. ‘मी समर्थकांशी बोलेन आणि आपली पुढील योजना १४ तारखेला सांगेन, असे मौर्य म्हणाले.
यूपीच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी नुकतेच मंत्रिपद सोडले आहे. लवकरच मी भाजपही सोडणार आहे. अखिलेश यादव यांनी माझे अभिनंदन केले आहे. पण सध्या मी समाजवादी पार्टीत नाहीए, असे मौर्य यांनी सांगितले. ‘मी आज आणि उद्या समर्थकांशी बोलून चर्चा करेन. यानंतर मी निर्णय घेईल आणि आपले पुढील राजकीय पाऊल काय असेल, हे १४ तारखेला जाहीर करेन असे’, असे मोर्य म्हणाले. ‘मी भाजपला लाथ मारली आहे. यामुळे परत फिरण्याचा प्रश्नच येत नाही, असे मौर्य यांनी स्पष्ट केले.
आपल्या राजीनाम्याने भाजपमध्ये भूकंप झाला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना आपले मन वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले. केशव प्रसाद मौर्य यांना आपले मन वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केशव मौर्य हे आपले धाकटे भाऊ आहेत. पण गेल्या ५ वर्षापासून त्यांची स्थिती वाईट आहे. माझ्यासोबत आणखी काही मंत्रीही आणि आमदारही येणार आहेत. माझा जो काही निर्णय असेल आणि १४ तारखेला आपल्यासोबत कोण येणार हे सर्व मी सांगणार आहे. माझी मुलगी संघमित्रा मौर्य ही बदायूंमधून खासदार आहे. पण भाजपमध्ये राहायचं की नाही, निर्णय ती स्वत: निर्णय घेईल, असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.

Leave a Reply