नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाखांच्या पुढे, दैनिक रुग्णसंख्या दीड हजारांच्या घरात

नागपूर : ७ जानेवारी – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ५ लाखांच्या पार गेली आहे. तर पूर्व विदर्भात आज एकूण २०९२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यात नागपुरात १४६१, चंद्रपूर २०७ , गोंदिया १७४, गडचिरोली ७७, वर्धा ११७ तर भंडारा शहरात ५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
वाढती रुग्णसंख्या फक्त प्रशासनाचं नाही तर नागरिकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. गेल्या २४ तासात नागपुरात १४६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आता ५००८१९ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्येने आज ५ लाखांचा टप्पा पार केला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ११५७ रुग्ण शहरातील, २३६ ग्रामीण भागातील तर ६८ जिल्ह्याबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज शहरात एकूण १२७२९ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ३५०६ चाचण्या ग्रामीण भागात तर ९२२३ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत.
शहरात आज एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या १०१२४ इतकी स्थिर आहे. आज ४९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८५००७ वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये १०२ ग्रामीण भागातील, शहरातील ३२८ तर जिल्ह्याबाहेरील ६७ रुग्णांचा समावेश आहे. शहरात सध्या ५६८८ सक्रिय रुग्णांची नोंद असून त्यातील ७७५ रुग्ण ग्रामीण भागातील तर ४८७६ रुग्ण शहरातील तर ३७ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.

Leave a Reply