सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

गरुडाचे पंख छाटलेली पत्रकारिता

आर्यन खानला NCB ने अटक केली आणि सर्व भारतावर पहाड कोसळला. साक्षात शाहरुख खानचा मुलगा त्याला कोणी अटक करु शकेल? अकूत संपत्तीचा मालिक शाहरुख खान – ह्याच्या मुलाला अटक झाली! मग मलिक ला पण चेव चढला. त्याचा जावई पण तत्सम केस मध्ये अडकलेला. मग मलिकांनी वानखेडेवर बिनबुडाच्या आरोपांची मालिका चालविली आणि शेवटी कोर्टात माफी मागितली असे कळते.
पण ह्या प्रकारात आमची पत्रकारिता, प्रसारमाध्यमे म्हणजे “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना – न्युज प्रसारीत करने मे खाना खजाना” असे होवू शकते? वाव आहे…..
ज्या पद्धतीने प्रसार माध्यमे आर्यन खान वरती कॅमेरा लावून बसली होती – पल पल की खबर – आर्यन खान को खाने मे बिस्कुट! आर्यन खान को जेल का खाना पसंद नही! आर्यन खान के कपडे! आर्यन खान दफ्तर मे सोए! आर्यन खान दफ्तर मे जागे! पेट खराब होने की वजह से आर्यन खान दो बार पादे! ही आमची डोंबल्याची पत्रकारिता.
मग मार्केटमध्ये आला मलिक – नाव नवाब बहुतेक शौक नवाबी कारण ह्याचा जावई नार्कोटिक्स च्या केस मध्ये अडकलेला.
आमचे राजकारणी सगळे धुरंधर. म्हणजे आपण कुठल्याशा केस मध्ये फसतोय किंवा आपले नाव येते म्हटल्यावर सगळे कायद्याच्या कचाट्यातून सुटायला भागिरथी प्रयत्न करतात. गुन्हे करायला जसे कायद्याचे उल्लंघन केले जाते. तद्वत गुन्हा उघडकीस आला की त्या गुन्ह्याला कायद्यात बसवून सुटकेचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला जातो. तेच आपला “हर्बल तंबाखू”. त्यासाठी आम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असतात.
आता शाहरुख खान आपल्या मुलाला जेल मध्ये भेटू शकत नाही. कारण कोरोना काळातील नियमावली मध्ये काही बदल केले गेले होते. त्या अनुषंगाने बाप लेकाची भेट दुरापास्त झाली. मग महामहीम माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शाहरुख खानच्या मदतीला सरसावले. नियम शिथिल करण्यात आला. शाहरुख खानला काय हवे ते नियमात बसवले गेले आणि बाप लेकाच्या भेटीच्या महत्पुण्याचा भागिदार, विश्वासघातकी मुख्यमंत्री धन्य झाला. असे ऐकिवात आहे.
आमची पत्रकारिता म्हणजे भाडझोकी भाडखाऊ – छापने का पैसा – न्युज चॅनलवर दिखाने का पैसा – जितना ज्यादा दिखाने का – उतना ज्यादा पैसा – शहानिशा न करता खोटी असलेली बातमी जास्त पसरवायचा, जास्त पैसा. अरे उतु नको मातु नको – घेतला वसा टाकू. पत्रकारिता जर तुझी आयुष्याची भाकरी आहे तर कष्टाची खानं रे बावा! कशाला भ्रष्टाचाराची भाकरी घरात आणून ते पापाचे अन्न, घरच्यांना खाऊ घालून स्वतः ची पिढी, स्वतः चे घर हे भ्रष्ट पत्रकार आपले घर, समाज, देश दुषित करीत आहेत. भ्रष्ट राजकारण्यांचे लांगुलचालन करीत स्वतः चे, समाजाचे आणि देशाचे नुकसान करीत आहे? वाल्यानी जेव्हा घरच्यांना विचारले की तुम्ही माझ्या पापाच्या कमाईचे भागिदार व्हाल का? तर घरच्यांनी सरळसोट “नाही” उत्तर दिले. मुद्दा संपला.
पण आमचे पत्रकार ऐषोआरामाची जिंदगी आणि easy money साठी वाट्टेल ते.
कॉंग्रेस, शिवसेना, राकॉं आणि तत्सम सर्व पक्ष देश लुटारु पक्ष आहेत असे म्हणायला सबळ पुरावे आजतागायत असताना प्रसारमाध्यमे मात्र खरी पत्रकारिता सोडून ह्या राजकारण्यांचे गोडवे गातात आणि सामान्य निरागस नागरिकांची दिशाभूल करीत त्यांना भ्रमित करुन, अपेक्षित पत्रकारितेचा भ्रमनिरास करतात. स्वतः च्या व्यवसायाशी प्रतारणा करीत, आपल्या पोटाची खळगी भरतात आणि पर्यायाने अगणित संपत्ती जमा करतात. मग अशा पत्राकारांचा उदो उदो होतो कारण हे पत्रकार पुढे भ्रष्ट राजकारण्यांचे बाहुले बनून शब्दच्छल करीत “ध” चा “मा” करीत सर्वसामान्य जनतेसमोर पारडे प्रसारमाध्यमांद्वारे भ्रष्ट राजकारण्यांच्या पदरात पाडत असतात. व्यावसायिक रित्या प्रगल्भ – वास्तव पत्रकारितेला तिलांजली देत असतात. स्वतः ची घरं भरत असतात नी सर्व जगाशी प्रतारणा करीत असतात.
वास्तविक “पत्रकारिता” हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. खऱ्या बातम्या, खरा भ्रष्टाचार शोधून तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार मंडळी गरजेचे. मात्र आज पत्रकार मंडळी स्वतः भ्रष्ट म्हटल्यावर – विश्वास कोणावर ठेवावा.
वाचकहो! पत्रकारांवर एवढ्या पोटतिडकीने लेखणीतून आसुड का ओढतोय? आज असे काय विपरीत घडले की एकदम पत्रकारितेला भाडझोके म्हणण्याप्रद मजल मारली! मित्रांनो, ह्यांच्या बातम्या आर्यन बिस्कुट खा रहा, जेल का खाना आर्यन को पसंद नहीं.. असल्या नशेडी आर्यनवर बातम्या देणारी प्रसारमाध्यमे एक बातमी देवून मोकळी झाली, “सिंधुताई सपकाळ ह्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन”
अरे! सर्व जगाला माय च्या तोडीची ममता माया लावणारी “जगन्माय” गेली आणि प्रसारमाध्यमांना काय ह्याच्या आधी सिंधुताई सपकाळ आजारी होत्या. त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते….. कसलीच दखल घेऊन … बातमी जनसामान्यांपर्यंत प्रसारित करण्याची गरज भासली नाही. ज्या स्त्री ने प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्यनिष्ठ लढा देत, १०५० अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी निभावली. अनाथ मुलांची माय बनून मायपण निभावलं. आज आमच्या पोटच्या एका मुलाचं करता करता हातभर फाटते.. ह्या आईने तर १०५० दत्तक पोरं पालनपोषणाची जबाबदारी घेत प्रसवले. प्रसवाची पिडा एकदाच. पण दत्तक घेतलेल्या पोरांचे पालनपोषण करण्याचा वसा घेऊन निभविण्याची पिडा, कष्ट, वेदना ह्या तर प्रसव पिडेपेक्षा हृदयद्रावक. अशा जगन्मायेचं प्रसारमाध्यमांनी केलेलं कौतुक म्हणजे,” सिंधुताई सपकाळ ह्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन” ज्या माऊलीचे जीवन सर्वस्वी त्यागमय होते, जी स्त्री स्वतः तील स्वत्व हरवून अनाथ मुलांशी रमली. त्यांच अनाथत्व काढून मायमाया दिली. अशा जगन्मातेला प्रसार माध्यमे एकदम मृत्यू झाल्याची बातमी देते. अरे! पत्रकारांनो गंजेट्टी नशेडी आर्यन खान (प्रसारमाध्यमांनी रंगविलेला) स्वतः साठी जगणारा आर्यन, त्याचा बाप स्वतः चे नाव वाचविण्यासाठी धडपडणारा अहंकारी, नवाब मलिक गुन्ह्यात फसलेल्या आपल्या जावयाला सोडविण्यासाठी कटिबद्ध. हा सगळा प्रकार देशद्रोही मालिकेत बसणारा. पण शाहरुख, मलिक ह्यांच्याकडून मलिदा लाटण्यात मशगुल, पत्रकारांना एकदा ही दखल घ्यावीशी वाटली नाही की महिनाभरापूर्वी सिंधुताई हर्नियाच्या ऑपरेशन नंतर आजारी होत्या. आजारपणात त्यांना काय पथ्ये होती? कोणता मुलगा – मुलगी त्यांच्या सेवेत आजारपणात सेवेकरी होते? राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय १७२ बक्षीस मिळविणाऱ्या सिंधुताई – जगन्माय. २७२ मुलामुलींची लग्न लावणारी जगन्माय, १०५० मुलामुलींची पालनपोषण करण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणारी जगन्माय, स्वतः तील “स्व” ची आहुती देणारी जगन्माय, “ॐभवती भिक्षां देही” १०५० पोरांसाठी भिक्षा मागणारी जगन्माय. अशा जगजाहीर देशाचा मान उंचावणाऱ्या, विदेशात डंका वाजविणाऱ्या, मानवतेची मान उंच करून – मानवतेची कसोटी जगणाऱ्या सिंधुताईंची पल पल खबर देणारी पत्रकारिता आज हरविली आहे. जी जगन्माता जन्मभर भिक्षेवर जगली, जिने संस्कारांना जगायचा प्रयत्न केला, जीने स्वतः च्या मुलांच्या अस्तित्वासाठी सर्वस्व बहाल केले, तिच्याकडे कुठुन येणार पैसा की जी स्वतः ची बातमी प्रसारमाध्यमांना देईल. सिंधुताईंचे कर्तृत्व इतके विशाल की प्रसारमाध्यमांना त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडले. पण ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्युची बातमी आली. जगानी जगन्माता हरविल्याचे अतोनात दु:ख व्यक्त केले. तरी पण असे वाटते की आंतरराष्ट्रीय स्तराच्या अशा प्रकारच्या व्यक्तींची पल पल खबर प्रसारमाध्यमांनी देणे आवश्यक आहे तर नव्हे हे त्यांचे कर्तव्य आहे, ह्या मताचा मी आहे.
सिंधुताई सपकाळ ह्या जगन्मातेला विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला स-आदर सद्गती देणार हे निश्चित. १३५ करोड लोकसंख्येच्या देशात केवळ एक सिंधुताई ईश्वर जन्माला घालत असतो जी माय – ममता – माया लावून हृदयाला चटका लावून, जगाला जगविण्याचे मर्म पटवून जगाचा निरोप घेत असते.
त्यांचे एक वाक्य आवर्जून आठवते त्याचा मतितार्थ असा, “जग पावसात भिजत असते अशावेळी गरुड मात्र ढगांच्या वर फिरत असतो. ते पंखाच बळ, ती विचार शक्ती त्यासाठी गरुडाचे पंख आणि विलक्षण झेप घेण्याची विचार क्षमता. ह्या दोन गोष्टी गरुड झेप साध्य करु शकतात.”
दुर्दैवाने आजची आमची पत्रकारिता, प्रसारमाध्यमे गरुडाचे पंख छाटल्यागत केविलवाणे धडपडताहेत, फेकलेल्या तुकड्यांना हस्तगत करण्यासाठी तडजोडयुक्त षंढावस्थेत फडफडताहेत, असे केविलवाणे विदारक दृश्य आहे.

भाई देवघरे

Leave a Reply