राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक नागपूरकर राजेश पिंजानी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

नागपूर : ५ जानेवारी – ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असताचा आता कला विश्वामधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते पुण्याला राहात होते पण त्यांच्या मुळ गावी नागपूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
‘बाबू बँड बाजा” सारख्या चित्रपटामधून समाजाचे वास्तविक दर्शन दाखवणाऱ्या दिग्दर्शकच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हळहळ व्यक्त करत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजानी हे तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे हृदयविकाराचा झटका आपल्यासोबत नाहीत ही दुःखद घटना. अतिशय जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजेश पिंजाणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर २०२१ या वर्षाला निरोप देत २०२२च्या स्वागताची पोस्ट केली होती. ही पोस्ट अभिनेता, गायक किशोर सौमित्र यांनी पोस्ट केली होती. त्यापोस्ट ची सुरवात “आज विजू माने या माझ्या मित्राची त्याच्या ” पांडू ” या हिट सिनेमा बद्दलची एक पोस्ट वाचली आणि आम्हा सगळ्याच कलावंताच्या नशिबी एकसारखे भोग का यावेत हा प्रश्न पडला .. म्हणून …, “अशी करण्यात आली होती.
बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पिंजाणी यांनी बाजू बॅंड बाजाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटात एका बॅन्डवाल्याचे आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आरसाच आपल्याला पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

Leave a Reply