मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांच्या पॅनलचा दणदणीत विजय

मुंबई : ३ जानेवारी – मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान पार पडले असून भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला.
एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उरलेल्या चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. या चारही जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सर्वपक्षीय लोकांचे सहकार पॅनेल २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे सहकार पॅनेलवर दरेकर यांचे वर्चस्व कायम राहिले.
या विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबई जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. अनेकांनी मुंबै जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीकाटिप्पणी केली होती. मात्र, मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply