भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत समीर वानखेडेंसाठी लॉबिंग करत असल्याचा नवाब मालिकांचा आरोप

मुंबई : २ जानेवारी – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे आणि एनसीबीच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत समीर वानखेडेंसाठी लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, एक आठवड्यापासून बातम्या पेरण्यात येत आहेत की, (समीर वानखेडे) मी एक्सटेन्शन घेणार नाही सुट्टीवर जाणार आहे. पण माझी माहिती आहे की, त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत. सर्व बेकायदेशीर कामे या अधिकाऱ्यांनी केल्याचे रिपोर्ट असतानाही भाजपचे नेते समीर वानखेडेला इथे ठेवण्यात उत्सुक आहेत. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का?
असू द्या… त्यांना इथे ठेवल्याने त्यांचा फर्जीवाडा बाहेर काढण्याची आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतकं होऊनलही हे अधिकारी पंचनामा बदलण्यात व्यस्त आहेत निश्चित रुपाने याबाबत चौकशीसाठी मी स्वत: पत्र लिहिणार आहे. न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाईल असंही नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीच्याच्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत त्याबाबत टप्प्याटप्प्याने यांचे फर्जीवाडे भविष्यात मी बाहेर काढणार आहे. हे पंचनामा बदलण्यासाठी काम सुरू होतं का याबाबत मला उत्तर हवं आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटेडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे.

Leave a Reply