नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, आज ९० रुग्णांचे अहवाल सकारात्मक

नागपूर : २ जानेवारी – नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच दिसतो आहे. काल रुग्णसंख्येत काही अंशी दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा नागपुरात ९० रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले असून, संग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.
गेल्या २४ तासात शहर व ग्रामीण भागात एकूण ५४८८ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यस्तील १९४३ चाचण्या ग्रामीण भागात तर ३५४५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. त्यात एकूण ९० रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले असून त्यातील ९ रुग्ण ग्रामीण भागातील तर ७३ रुग्ण शहरातील आहेत तर ८ जिल्ह्याबाहेर रुग्ण आहेत. एकूण बाधितांची संख्या आता ४९४१९३ वर पोहोचली आहे. सुदैवाने आज शहरी किंवा ग्रामीण भागात कुठेही कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद नाही त्यामुळे एकूण मृत्युसंख्या आताही १०१२३ वर स्थिर आहे.
आज ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४८३६६४ वर पोहोचली असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या ३५ ग्रामीण भागातील, ३५५ शहरातील तर इतर जिल्ह्यातील १६ असे एकूण ४०६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण शहरात्त असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Reply