आमदार बंटी भांगडिया यांच्या नातेवाईकांना जबर मारहाण

नागपूर : २ जानेवारी – नागपुरात भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या गाडीवर अज्ञात आरोपीने आधी दगडफेक केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. नंतर जाब विचारताच अंकित भुतडा आणि फिरदोस खान यांना मारहाण केली. यात फिरदोस हे जखमी झाले. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला.
भाजप आमदार बंटी भांगडीया यांचे चुलतभाऊ अंकित भुतडा आणि त्यांचे पार्टनर फिरदोस खान हे एका कारमधून जात होते. महाराष्ट्र बँक चौक परिसरात पाच अज्ञात आरोपींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्याचा जाब त्या आरोपींना फिरदोस यांनी विचारला. त्यांनी त्यांना गाडीतून ओढत जबर मारहाण केली. अंकीत गाडी चालवत होता. त्याने गाडी बाजूला लावून तो धावला असता त्याला सुद्धा मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती धंतोलीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.
तू कोण हैं, तू समजता क्या हैं, आमदार का भाई है क्या असं म्हणत शिवीगाळ केली. मात्र एका ऑटो चालकाने भाग जावं म्हटलं म्हणून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक जमतील हे बघून आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला. सगळे आरोपी बाईकवरून पळाले.
मारहारण करते वेळी ‘तुम क्या आमदार के भाई हो क्या’ असा सारखा उल्लेख आरोपी करत होते. यामुळे आरोपींकडून कट रचून हा हल्ला केल्याचे दिसून येते. आरोपींना आपण ओळखत नाही. त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी माहिती फिरदोस यांनी दिली. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये पाचही आरोपी दोन दुचाकीवरून जाताना दिसून आले आहे. पोलीस त्यांची ओळख पटवत आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सोबत जात असताना मी कार चालवत होतो. फिरदोस हे बाजला बसले होते. मुळात फिरदोस हाच आमदाराचा भाऊ असावा, असा हल्लेखोरांचा समज झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर जबर हल्ला केला. यावेळी आरोपींनी मलाही मारहाण केली, अशी माहिती अंकित भुतडा यांनी दिली.

Leave a Reply