नारायण राणेंना कणकवली पोलिसांकडून नोटीस

सिंधुदुर्ग : २९ डिसेंबर – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गातील कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली आहे. नोटीसनुसार, आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे.
काल पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नितेश राणेंचा ठावठिकाणा विचारला असता ठिकाण सांगायला मी काय मूर्ख आहे का ? असे विधान केले असल्याचा नोटीसीत उल्लेख केला आहे.
कणकवली पोलिसांनी नोटीस नारायण राणेंना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फोनवर प्रतिक्रिया देत म्हटलं, मला कोणत्याही स्वरूपाची नोटीस प्राप्त झाली नाही. मी केंद्रीय मंत्री आहे. मला अशी नोटीस पाठवतां येत नाही.
28 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितेश राणे कुठे आहेत? तेव्हा नारायण राणे यांनी संतप्त होत म्हटलं, कुठे आहेत हे सांगायला मला काय तुम्ही मुर्ख माणूस समजलात का? कुठे आहेत हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही. तुम्हाला का सांगावं? असा सवालही नारायण राणेंनी केला.

Leave a Reply