गांधी कुटुंबाने अमेठीतील जनतेचा फक्त मतासांठी वापर केला – स्मृती इराणी

नवी दिल्ली : २९ डिसेंबर – “मी पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा इथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय नव्हते अस्तित्वात नव्हते. एवढंच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते. अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनंच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचं देखील आश्वासन देण्यात आलेलं पण दे अस्तित्वात मात्र आलं नव्हतं. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासनं मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत,” असं म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली.
स्मृती इराणी म्हणाल्या, “गांधी कुटुंबाने अमेठीतील जनतेचा फक्त मतासांठी वापर केला. बाकी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. फक्त अमेठीच नाही तर सोनिया गांधींचा मतदारसंघ रायबरेलीची देखील हीच अवस्था आहे. दोन्ही मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हे दोन्ही मतदारसंघ महामार्गाशी जोडण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही,” असं इराणी यांनी सोनिया आणि राहुल गांधींना सुनावलं.
काशी कॉरिडोर मतांसाठी बांधण्यात आला का असं विचारलं असता स्मृती इराणी म्हणाल्या, “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास काशीमध्ये खासदार म्हणून मोदीजींना कोणतंही आव्हान नाही. आणि आम्ही नुसता कॉरिडॉर बनवला नाही तर पूल, रस्ते, पाणी आणि टॉयलेट इत्यादी सुविधा देखील पुरवल्या आहेत. मोदीजींनी काशी कॉरिडॉर बनवला आणि काँग्रेसला ते आवडलं नाही. मला राजकारणाचा जेवढा अनुभव आहे, त्यावरून सांगते की खासदार म्हणून मोदीजींना कोणतेही आव्हान नाही. खासदार म्हणून मला कोणतेही आव्हान नाही. लोकांसाठी काम करण्याची एक संधी मिळाली तरी ते आशीर्वादच आहेत. निवडणुकीत कोण जिंकेल किंवा हरेल, सांगता येत नाही. ही फक्त रणभूमी आहे,” असं इराणी म्हणाल्या.

Leave a Reply