अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिले स्वेच्छा मरणाची मागणी करणारे निवेदन

अकोला : २७ डिसेंबर – राज्यात एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारही त्यांच्या निर्णयावर थांब आहे. यासगळ्यात सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. अशात आता अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर, संप मागे न घेतल्यामुळे अनेक एसटी कामगारांना कामावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. याच सगळ्याला कंटाळून आता एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या ५२ दिवसांपासून दुखवटा पाळत आहे. एसटी कर्मचारी हा विलीनीकरणासाठी ५२ दिवसापासून सरकारला रोज कोणत्या ना कोणत्या मार्गे एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे यासाठी सरकारला मागणी करत आहे. पण आजपर्यंत ऐकूण ६० एसटी कर्मचयाऱ्याच्या आत्महत्या झाल्या, तरीही हे सरकार अजूनही झोपलेलं आहे. आमच्याही मनात आत्महत्या कराव्या असे विचार येतात. मात्र, आत्महत्या करणं हे कायद्याने गुन्हा आहे, असं म्हणत अकोकल्यात स्वेच्छा मरणाची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, आंदोनल आणि निवेदन देऊनही आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच आम्ही कुठल्याही दबावमध्ये न येता स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहे. कारण, आम्ही आता सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला आणि मानसिक त्रासाला वैतागलो आहोत, असं निवेदन कर्मचाऱ्यांनी सरकारला दिलं आहे.
अजून किती आत्महत्या या सरकारला हव्यात? असा प्रश्न प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला पडला आहे. म्हणूनच आज सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण करा नाहीतर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी’ अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply