अमरावतीतील चांदूरबाजार येथे भीषण अग्नितांडव

अमरावती : २६ डिसेंबर – चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे, सकाळी भीषण आग लागली. या आगीत तीन घरे,दोन जनावरांचे गोठय़ांसह,दोन गाई व एक ट्रॅक्टर आगीत जळून खाक झालेत. प्राथमिक अंदाजानुसार सात ते आठ लाखांचे झाले आहे. तर तीन कुटुंबे उघडल्यावर आली आहेत.
सकाळी ११ च्या सुमारास सदर भीषण आग लागल्याचा अंदाज आहे. अंदाजे दोन तास चाललेल्या अग्नितांडवाने काही कळायच्या आत उग्ररुप धारण केले. या अग्नीप्रलयात अरूण मानकर,मंगला काळे,अब्दुल सत्तार,या शेत मजुरांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत यांचे घरातील धान्यांसह सर्व संसार उपोयोगी साहीत्यांची लाख झाली. तर योगेश अलोणे व गजानन फुले या शेतकऱ्यांचे गोठे जळुन खाक झाली.
सदर आगीत शेतकरी योगेश अलोणे यांच्या दोन गाई जळून खाक झाल्या.तर गजानन फुले यांचे ट्रॅक्टरसह,सर्व शेती साहीत्य ही पुर्णत: जळाला आहे.तसेच तिन्ही शेतमजुरांचा संसारही या आगीत भस्मसात झाला आहे. या शेतमजूरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था,जि.प.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा ७ ते ८ लाखाचा असला तरी,प्रत्यक्ष पाहणी अहवाला नंतर हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आग लागल्याचे लक्षात येताच वणी ग्रामस्थांनी, घटनास्थळाकडे धाव घेतली.सर्वांनी सामुहिकरीत्या आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. परंतु आगीचे रौद्ररूप पाहता प्रसंगावधान राखून,प्रहारचे मंगेश देशमुख यांनी तातडीने चांदूरबाजार येथील अग्निशमन दलात प्राचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली.आगीची माहीत मिळताच, महसूलच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply