वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पप्प्या हा बावळा …
(चाल — राधा ही बावरी ..)

डोक्याने मठ्ठ तोंडाने फट्ट
हे ध्यान कसे बडबडते $$
विसरूनि भान विसरूनि वाण
ते पोपटपंची करते !
या राजकारणी मंचावरती
खंबा मारुनी आला
पप्प्या हा बावळा। बुढीचा पप्प्या हा बावळा ।।

मंचावरती जाताना ।
हर्बल गांजा हा घेतो
कधी चपटी कधी खंबाही
पोटामध्ये रिचवितो
आलूचेही सोने करतो
ऐसे ठोकुन देतो !
जवळी पाहुन निवडणुका हा नकली हिंदू होतो !
या राजकारणी मंचावरती खंबा मारुनी आला ।। पप्प्या हा बावळा …

हिंदुत्वाची ऍलर्जी
आज्यापणज्या पासुनची
डीएनएतच याच्या हो
आवड पांढऱ्या हिरव्याची !
हिंदूंना आतंकी म्हणतो । शांतीदूत हिरव्यांना !
विदूषकी नित चाळे करुनी तोषवितो सगळ्यांना !
या राजकारणी मंचावरती
खंबा मारुनी आला ।।
पप्प्या हा बावळा ।
बुढीचा पप्प्या हा बावळा ।।

           कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply