राज्यात अवघ्या ५ महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

मुंबई : २४ डिसेंबर – एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात अवघ्या ५ महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर महिन्यातील ही आत्महत्यांची प्रकरणाची माहिती समोर आली आहे.
यावर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत १०७६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. ४९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली. तर २१३ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरवण्यात आले असून ३७२ आत्महत्यांची पडताळणी व्हायची आहे. त्यात ४९१ पैकी ४८२जणांना मदतीच वाटप करण्यात आलं आहे.
कर्जबाजारीपणा, कर्जफेडीचा तगादा आणि कर्जाची परतफेड न केल्याने या आत्महत्या झाल्या असल्याचं माहिती मिळतेय. तसंच आस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांनी नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कारणांमुळे आत्महत्या केली आहे.आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती सभागृहाला याबाबतची माहिती दिली आहे.
शेतकरी आत्महत्या आणि त्यांना मिळालेल्या नुकसान भरपाई बाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तरे देताना ही आकडेवारी सभागृहासमोर मांडण्यात आली.

Leave a Reply