वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मामु बिमारु ! राज्य बिमारु !

कुठलंही काम न करता
घरी बसून हरामाचं खातो
त्याला लोक ,
ऐतखाऊ म्हणतात !

असा माणूस महाराष्ट्रात
कोण आहे हे आता
लोक न सांगताही
पटकन ओळखतात !

तब्येत बरी नाही म्हणून
नागपूर अधिवेशन टाळलं !
मुंबईतल्या अधिवेशनालाही
सुमुख नाही दावलं !

महीनोंमहिने सुट्या घेऊनही
पदभार दुसऱ्यास देववत नाही !
स्वतःवर त्यांचा नाहीच नाही, पण
सहकाऱ्यांवरही विश्वास नाही !

स्वतःबरोबर राज्यालाही
ते करणार आहेत बिमार !
काळ्या काळ्या ढगालाही
दिसत नाही किनार !

समृद्ध संपन्न राज्यालाही
त्यांनी करून दाखवलं भकास !
याला म्हणतात,”आधीच उल्हास
आणि वरून फाल्गुन मास !

          कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply