पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित करत सुधीर मुनगंटीवारांनी साधला नवाब मालिकांवर निशाणा

मुंबई : २३ डिसेंबर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून यावेळी अनेक मुद्द्यांवरुन सभागृहात चर्चा सुरु आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी यावेळी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडला. यावर चर्चेदरम्यान बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित करत नवाब मलिकांवर निशाणा साधला. अजित पवारांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? असा टोलाही यावळी त्यांनी लगावला.
मुस्लिम आरक्षणावर नवाब मलिक बोलून झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले होते. “अबू आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभागृहात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे सभागृह चर्चा आणि संवादासाठी आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे नवाब मलिकांकडे विधी व न्याय खातं नाही. पण त्यांनी यावर कायदेशीर मार्गदर्शन व्यक्तिगत आधारे केलं की सरकारचं मत व्यक्त केलं?,” अशी विचारणा त्यांनी केली.
नवाब मलिक यावेळी बोलण्याचा प्रयत्न करत असता ते म्हणाले ,की, “अल्पसंख्यांक मंत्री आरक्षण देत नाहीत. नाहीतर यांनी रात्रीच्या रात्री फाईल काढली असती”. यांनंतर सत्ताधारी पक्षातून गोंधळ घालत मग तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता अशी विचारणा केली. यानंतर मुनगंटीवारांनी या मुद्यावरुन अजित पवारांवरच निशाणा साधला.
तुम्ही अजित पवारांचे विरोधक आहात का? मग कशाला रात्रीचे उद्योग तुम्ही करता असं म्हणता. अजित पवारांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? हे बरोबर नाही, ते आमचे जवळचे मित्र आहेत,” असा उपहासात्मक टोला लगावला.
तुम्ही अजित पवारांचे विरोधक आहात का? मग कशाला रात्रीचे उद्योग तुम्ही करता असं म्हणता. अजित पवारांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? हे बरोबर नाही, ते आमचे जवळचे मित्र आहेत,” असा उपहासात्मक टोला लगावला.

Leave a Reply