डॉ. साधना नाफडे यांच्‍या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ ‘कथक साधना’, २८ पासून तीन दिवसीय कार्यक्रमात कार्यशाळा व स्‍मरणिकेचे प्रकाशन

नागपूर : २३ डिसेंबर – भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याच्‍या प्रचार व प्रसारक, कथक गुरू डॉ. स्‍व. साधना नाफडे यांच्‍या स्‍मृत‍िप्रीत्‍यर्थ ‘कथक साधना’ कार्यक्रमाचे येत्‍या, २८ ते ३० डिसेंबर दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले आहे. निर्झर कला संस्‍थान, गुरू साधना फाउंडेशन व संस्‍कार भारती, नागपूर यांच्‍या संयुक्‍तवतीने आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमात कथक कार्यशाळा, साधना स्‍मृती स्‍मरण‍िकेचे प्रकाशन, लेक्‍चर डेमॉस्‍ट्रेशन, स्‍मृतिगंध असे विविध उपक्रम घेण्‍यात येणार आहेत.
प्‍लॅट‍िनम ज्‍युबिली सभागृह, ब्‍लाइंड रिलीफ असोस‍िएशन, नागपूर येथे 28 तारखेला आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे कथक नर्तक गुरू पं. राजेंद्र गंगाणी यांच्‍या कार्यशाळेने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पं. राजेंद्र गंगाणी हे जयपूर घराण्‍याचे कथक नर्तक असून त्‍यांचे देश-व‍िदेशात शेकडो कार्यक्रम झाले आहेत. संगीत, नृत्‍य, काव्‍य आण‍ि च‍ित्र या चार कलांचा उत्‍कृष्‍ट संगम आपल्‍या नृत्‍यातून साधणारे पं. राजेंद्र गंगाणी हे ‘गुरूजी’ नावाने पर‍िचित आहेत. त्‍यांना संगीत नाटक अकादमीच्‍या पुरस्‍कारासह संगीत राज, शास्‍त्रीय नाट्य शिरोमणी आदी पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. 30 तारखेपर्यंत रोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेदरम्‍यान होणा-या या कार्यशाळेत पं. राजेंद्र गंगाणी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतील.
28 तारखेला सायंकाळी 7 वाजता नृत्‍यदिग्‍दर्शक व कथक गुरू शमा भाटे यांचे ‘कथक’ वर लेक्‍चर डेमॉन्‍स्‍ट्रेशन होणार आहे. त्‍यानंतर ‘स्‍मृतिगंध’ हा स्‍व. साधना नाफडे यांच्‍या स्‍मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. यात अभिनेता, लेखक, दिग्‍दर्शक जयंत गडेकर, कथक नृत्‍यांगना अभिनेत्री व लेखिका डॉ. श्‍वेता पेंडसे, कथक नृत्‍यांगना निलाक्षी सक्‍सेना, मनिषा पाध्‍ये – पात्रीकर, अमिता राजूरकर-दंडिगे व मंजूषा सोनबरसे-हनकरे यांचा सहभाग राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत पात्रीकर करणार आहेत. त्‍यानंतर ‘गजरा’ चित्रपटाचे दिग्‍दर्शक विनित शर्मा यांच्‍या उपस्‍थ‍ितीत प्रदर्शन केले जाणार आहे.
29 तारखेला सायंकाळी 7 वाजता संस्‍कार भारतीच्‍या विदर्भ प्रांत अध्‍यक्ष कांचन गडकरी यांच्‍या हस्‍ते ‘साधना स्‍मृती स्‍मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी पं. राजेंद्र गंगाणी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहील. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध कथक नृत्‍यांगना व गुरू निलाक्षी सक्‍सेना ‘कृष्‍णांगी’ क‍थक नृत्‍यनाटिका सादर करतील.
30 तारखेला सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध तबला वादक रिम्‍पा शिवा यांचे सोलो तबला वादनाने तीन दिवसीय कार्यक्रमांचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply