रावसाहेब दानवे यांनी नागपूर संघ मुख्यालयात जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट

नागपूर : २२ डिसेंबर – भाजपचे वरिष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपूर संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे रावसाहेब दानवे यांनी भेटीनंतर सांगितले. रेल्वे राज्यमंत्री दानवे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत तसेच अनेक पदाधिकारी संघ मुख्यालयात मुक्कामी होते. त्यांची भेट घेतली. संघ कार्यालयात येणे हे काही माझ्यासाठी नवीन नाही. संघ कार्यालयात सरसंघचालकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. बाकी दुसरा कुठलाही उद्देश नसल्याचे म्हणत त्यांनी राजकीय विषयावर बोलणे टाळले.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रावसाहेब दानवे महाल परिसरात संघाच्या मुख्यालयात पोहचले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी संघ मुख्यालयात मुक्कामी आहेत. या सर्वांशी राबसाहेब दानवे यांनी चर्चा केल्याचे समजते.

Leave a Reply