घरासमोर खेळात असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीला अज्ञातांनी पळवून नेले

यवतमाळ : २२ डिसेंबर – घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्ष चिमुकल्या मुलीला अनोळखी आरोपीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कुरा डुमणी येथे दुपारी घडली. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेत आहे. मानवी अविनाश चोले (वय तीन), असे बेपत्ता मुलीचे नाव आहे.
दुपारी मानवी घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. वडील शेतात गेले होते. तर, आई घरी होती. दुपारी २.४० ला वडील घरी आले असता त्यांना मुलगी दिसली नाही. याबाबत त्यांनी पत्नीकडे विचारणा केली असता त्यांनी ती खेळत असल्याचे सांगितले. मात्र,घराजवळील परिसरात व गावात शोध घेऊनही ती मिळाली नाही.
अखेर अविनाश चोले (२९)रा.कुरा डुमणी यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून,अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार सतिश चौधार, विकास खंडारे करीत आहे.
घरी खेळत असताना तीन वर्षे चिमुकलीला अनोळखी व्यक्तीने पळून गेल्याचा संशय आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी ठाणेदार पितांबर जाधव यांनी विशेष तपास पथक तयार केले. पथकातील जमादार मुकुंद केंद्रे रवी चव्हाण प्रीती कुमठे यांचे पथक बेपत्ता मुलीचा शोध शेत शिवार जंगले आदी ठिकाणी घेत आहे.

Leave a Reply