केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली : २१ डिसेंबर – संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनी संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून ते विजय चौकापर्यंत मार्च काढला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी विरोधी पक्षांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
विरोधी पक्षांनी संसदेत लखीमपूर खिरी हत्याकांड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यामागे कट असल्याचा आरोप आहे. ही गंभीर घटना आहे. पण पंतप्रधान मोदींनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेली नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यावेळी राहुल गांधींसोबत होते.
आम्ही त्याला सोडणार नाही (मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा). आताही नाही आणि उद्याही नाही. आम्ही त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्याला सरकार वाचवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा हे गेल्या ६ दिवसांपासून संसदेत आणि दिल्लीत दिसलेले नाहीत. दिल्लीत १६ डिसेंबरला सव्वा १२ वाजता ते दिसून आले होते. त्यांना जाता कॅमेऱ्यांनी टिपलं होतं. त्यानंतर मंत्री अजय मिश्रा हे गृह मंत्रालयात आलेले नाहीत. तसंच ते संसदेततही दिसले नाहीत. एवढचं काय तर ते आपला मतदारसंघ लखीमपूर खिरीमध्येही दिसलेले नाहीत. यामुळे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा हे कुठे आहेत, याची माहिती कुणाला नाही.

Leave a Reply