शहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केलं ते पूर्ण असत्य – संजय राऊत

नवी दिल्ली : २० डिसेंबर – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. आता अमित शहांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. पुण्यात येत आम्हाला शिकवू नका. महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी आहे. तिथे खोटं बोलण्याचं पातक करू नका, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विश्वासघात केला, असा आरोप अमित शहांनी केला होता. त्यालाही राऊत यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांनी पुण्यात रविवारी जे काही वक्तव्य केलं ते पूर्ण असत्य होतं. ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधतोय. आमच्या सरकारविषयी आणि हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू, असा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्र भाजपचे नेते वैफल्यात आहेत. आता भाजपचे सर्वोच्च नेतेही वैफल्यातून बोलत आहेत. सत्ता गेल्याने ते अस्वस्थ आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कधीच सोडला नाही. २०१४ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेला दूर करा असे सांगणारे कोण होते. भाजप नेते आम्हाला खासगीत सांगत होते. हे ते अमित शहा होते. २०१४ च्या निवडणुकीवेळी आम्ही वेगळे लढलो होतो. आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे यश मिळवले. २०१४ पासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण होते, असा सावल करत राऊत यांनी अमित शहांना लक्ष्य केलं.
डीबीटी’ डायरेक्ट टॅक्स बेनिफिट योजनेवरून अमित शहांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केला. एक डीलर, एक ब्रोकर आणि एक ट्रान्स्फर करणारा पक्ष आहे, असं शहा म्हणाले. ट ला ट… फ ला फ आणि झला झ आम्ही लावता येतो. असे आरोप आणि टीका निरर्थक आहेत, असं राऊत म्हणाले.
सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही तीन चिलखतं काढून दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही समोरून लढतो. शिवसेना हा छातीवर वार झेलणारा पक्ष आहे. केंद्रानं प्रयत्न करूनही महाराष्ट्र सरकारचं काहीच बिघडलं नाही. आमच्याशी दगाबाजी करणार हा त्यावेळीचा ‘पावर ब्रोकिंग’चा प्रकार होता. ‘पावर शेअरिंग नव्हे, तर पावर ब्रोकिंग’ होते. देशाच्या गृहमंत्र्यांना देशामध्ये काम नसेल तर आम्हाला सांगावं. कर्नाटकमध्ये शिवरायांचा अपमान होतोय. तिथे बघावं शिवरायांच्या पुण्यभूमीत खोटं बोलू नका. पुण्यात येऊन आम्हाला शिकवू नका, असा टोला राऊत यांनी लगावला.
तिन्ही पक्षांनी आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन आता आमच्याशी लढून दाखवावं, असं आव्हान अमित शहांनी दिलं. आधी तुम्ही राजीनामा द्या. १०५ आमदारांनी निवडून आणून दाखवा, असं राऊत म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या करात कपात न करता दारूच्या किंमती कमी केल्यावर शहांनी हल्लाबोल केला. पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर ४-५ रुपये कर कमी करता. आधी मोठ्या प्रमाणावर कर वाढवला, त्याच कायं? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठणठणीत आणि ते काम करत आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

Leave a Reply