बुलढाण्यात १०० किलो गांजासह तिघांना अटक

बुलढाणा : २० डिसेंबर – खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारामध्ये १0 लाख रुपये किंमतीचा १00 किलो गांजा हिवरखेड पोलिसांनी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकासोबत जप्त केल्याची घटना ३ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, तीन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत हिवरखेड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, हिवरखेड शिवारात किन्ही महादेव फाटा हॉटेल कुलश्री समोर काही व्यक्ती गांजा घेऊन येणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी करून रात्री ३ वाजता दोन मोटरसायकली अडविण्यात आल्या. यावेळी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून १00 गांजा किंमत १0 लाख रुपये मिळून आला. यावेळी, अंधाराचा फायदा घेऊन इतर तिघे आरोपी फरार झाले आहेत. तर पोलिसांनी रमेश कचरू चव्हाण, रमेश मांगीलाल पवार व एक महिला सर्व रा. अंत्रज तालुका खामगाव यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील १00 किलो गांजा किंमत १0 लाख रुपये, युनिकॉन होंडा कंपनीची दुचाकी एम. एच. २८ / ए. एल. ९१ ६९ किंमत पंचेचाळीस हजार रुपये, हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल क्रमांक एम. एच. २८/ बी. एच. ६९६१ किंमत तीस हजार रुपये, तीन मोबाईल हँडसेट, असा एकूण १0 लाख ८१ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध एपीआय गोकुळ सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कलम ८ (क), २0,२२ एनडीपीएस एक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हिवरखेड पोलिस स्टेशनचे एपीआय गजानन वाघ करीत आहेत

Leave a Reply