नागपुरात ४ लाखाचा नायलॉन मांजा जप्त

नागपूर : २० डिसेंबर – न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही पाचपावली परिसरात प्रतिबंधित करण्यात आलेला मांजा चक्क पोलिस चौकीमागेच बिनबोभाट विकला जात होता. मांजा विक्रीच्या या अड्डय़ावर गुन्हे शाखा, युनिट तीनच्या पथकाने छापा टाकला. येथून तब्बल ७0७ चकऱ्या जप्त करण्यात आल्या.
सुबोध मदनलाल कोहाड (३0) नाईक तलाव पोलिस चौकीमागे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, जप्त करण्यात आलेल्या मांजाची किंमत ४ लाख २४ हजार २00 रुपये इतकी आहे.
सुबोध मदनलाल कोहाड जीवघेण्या मांजाची मोठय़ा प्रमाणात विक्री आणि साठवणूक करतो, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिस पथकाला मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रदीप रायन्नावार आणि सहायक निरीक्षक पवन मोरे यांच्या पथकाने कोहाडच्या घरी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास छापा घातला.

Leave a Reply