रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट अर्पण करणार शहीदांना आगळीवेगळी श्रद्धांजली.

नागपूर-१८ डिसेंबर- रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांचे संयुक्त विद्यमाने दिवंगत लष्करप्रमुख जनरल विपीन रावत आणि त्यांच्या दिवंगत पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रम करण्यात आला आहे…

श्रद्धांजली शंखनादातून… या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ सायं ५ वाजता धनवटे सभागृह वोकहार्ट हॉस्पिटलच्या आवारात, शंकर नगर नागपूर येथे करण्यात आले आहे… या समारोहात भारतीय लष्कराला प्रथमच भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून शंखनाद संगीतबद्ध करण्यासाठी जनरल रावत यांच्या सोबत काम करणाऱ्या नागपूरच्या संगीतज्ञ डॉ.तनुजा नाफडे या रावत दांपत्याच्या सहवासातील आठवणींना उजाळा देतील.

ख्यातनाम निवेदिका प्रभा देउस्कर या डॉ.नाफडे यांना मुलाखतीद्वारे बोलते करतील.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर जनरल श्री अच्युत देव राहतील. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष श्री. अजय पाटील यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल…

या कार्यक्रमात जनरल रावत यांच्या कार्यकाळात भारतीय लष्करासाठी बनवण्यात आलेल्या शंखनाद या भारतीय सुरावटीच्या मार्शल ट्यूनचा सांगितिक प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे…

या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीदांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट चे अध्यक्ष रो. शुभंकर पाटील, संस्थापक अध्यक्ष रो. अविनाश पाठक, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, विदर्भ प्रांत सचीव सौ. सुनिता मुंजे यांनी केले आहे

Leave a Reply