यूपी विधानसभा निवडणूक ही सेमीफायनल नाही – प्रशांत किशोर

नवी दिल्ली : १९ डिसेंबर – उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता यूपीच्या निवडणुकीबद्दल एक भाकीत केले आहे. विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी त्याचा थेट परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल असे म्हणता येणार नाही, असे प्रशांत किशोर यांचे मत आहे. यूपी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवेल, असा काही लोकांचा असा विश्वास आहे. पण तसे होणार नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ओळखले जातात. मग तिथे ध्रुवीकरण कसे होणार? या प्रश्नाला उत्तर प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले. राज्यातील ध्रुवीकरणाचा चेहरा काहीही असो किंवा ध्रुवीकरणाची घटना काहीही असो, त्याला मर्यादा असतील,
२०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप यूपीमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होता. समाजवादी पक्षाने राज्यात विजय मिळवला. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. २०२४ पूर्वी इतर अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामुळे यूपी विधानसभा निवडणूक ही सेमीफायनल नाही, असे प्रशांत किशोर पुढे म्हणाले.
राजकारणात संकेत आणि वर्तन हे शब्दांपेक्षा खूप काही सांगून जातात. पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तो शेअर केला होता. या फोटोत पंतप्रधान मोदी योगींच्या खाद्यारव हात ठेवून महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करताना दिसत आहेत. आता त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘यूपी अधिक योगी म्हणजे ‘उपयोगी’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आता पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचे राजकीय विश्लेषण समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींची यूपीतील शहाजहानपूरमध्ये शनिवारी सभा झाली. पंतप्रधान मोदींनी ५९४ किलोमीटरच्या गंगा एक्स्प्रेस-वेच्या योजनेचे भूमिपूजन केले. त्यानंतर ही जाहीर सभा झाली. सहा पदरी गंगा एक्स्प्रेस-वे हा मेरठपासून ते प्रयागराजपर्यंतचा आहे. २०२५ मध्ये तो पूर्ण होईल. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘यूपी अधिक योगी म्हणजे ‘उपयोगी’, असं वक्तव्य केलं. एकप्रकारे पंतप्रधान मोदींचं योगींच्या मुख्यमंत्रीपदावरच शिक्कामोर्तब असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply