महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसची पदयात्रा, पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती

नागपूर : १९ डिसेंबर – महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसनं पदयात्रा काढली. या पदयात्रेत पालकमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळा नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सिलिंडर गॅसचे दर भरमसाठ वाढले. गृहिणींनी घरचे बजेट कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. सिलिंडरचे पोस्टर्स झडकविण्यात आले.
वाढता महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बेहाल केले, असा आरोप करत काल महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसने पदयात्रा काढली. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्त्वात ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात
घोषणाबाजी करण्यात आलीय.
केंद्र सरकारने पेट्रोल–डिझेल आणि गॅस या इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला. बेझनबाग, दहा नंबर पुलिया, आवळे बाबू चौक, कमाल चौक, इंदोरा परिसरात ही पदयात्रा काढण्यात आलीय.
पदयात्रा बेझनबाग येथून निघून बाबू चौक, कमाल चौक मार्गे परत बेझनबागमध्ये आली. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारनं महागाई आणि बेरोजगारीबाबत नागरिकांना दिलासा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पदयात्रेत इंधन व गॅस दरवाढीचे निषेध करणारे फलक उंचावण्यात आले. आंदोलनात राजेंद्र करवाडे, कृष्णकुमार पांडे, अनिल नगरारे, रत्नाकर जयपूरकर, ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, दिनेश यादव, नेहा राकेश निकोसे, परसराम मानवटकर आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply